श्रीमती कमलाबाई भास्करराव गाडगीळ प्राथमिक, कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह

स्थापना-१९६५

नाही माता नाही पिता। अगतिक काहींची ममता॥
अशा मुलांना देत हात। मधे नाही धर्म नि जात ॥


अनाथ, निराधार मुलामुलींना मायेची सावली देणार्‍या बालगृहात एकावेळी ७५ बालकांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं जातं.

त्यांच शिक्षण, संस्कार, माया, आरोग्य, स्वावलंबन, वाचन, विज्ञान, कला-क्रीडा, दैनंदिन कामकाज, मनोरंजनाबरोबरच सामाजिक भानही इथं आपुलकीनं जपल जातं. सुशिक्षित प्रशिक्षित अध्यापक वर्ग, कर्मचारी अल्प अनुदानातही या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी झटत असतात

इथून शिकून मोठे झालेले विद्यार्थी आज समाजात अनेक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत शाळेचे बालगृहाचे नाव उज्ज्वल करत आहेत. शासनाच्या अनुदानाबरोबर अन्य मदतीचे हातही या अनाथ मुलांच्या पालनपोषणांत सहकार्य करतात. आतापर्यंत तीन मुलींची लग्न करुन त्या आपला संसार सुखात करत आहेत.