संस्थेविषयी दोन शब्द
- १९५२ पासून अहमदनगर ज़िल्ह्यातील शैक्षणिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बज़ावणारॆ संगमनेरचे बाल शिक्षण मंडळ
- सृजनशील उपक्रमांनी सातत्यपूर्ण गुणवत्तेकडे मार्गक्रमण करणारी संस्था
- देशप्रेम व सामाज़िक विकासाकरिता वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांद्वारे भरीव कार्य
- पाच हज़ार विद्यार्थ्यांचे आदर्श शैक्षणिक संकुल
- निराधार परित्यक्त्य बालकांना मायेची सावली देणारे बालसंगोपन केंद्र
- संगोपन, संवर्धन, संस्कार याद्वारे प्रेरक साथ
- स्वयंसिद्ध, स्वावलंबी व संस्कारित बालक हा एकच ध्यास
- संगमनेर व तालुक्यातील बालक व कुमारांकरिता पुर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक गुणवत्तापुर्ण संगणक प्रशिक्षणास कटिबद्ध असणारी संस्था
- ज़गाच्या कानाकोपर्यात पोहोचलेले स्वयंपुर्ण, प्रज्ञावान व गुणवंत विद्यार्थ्यांद्वारे राष्ट्राच्या संपन्न जडणघडणीत मोलाचे योगदान
- दहावी, बारावी राज्यस्तरीय परीक्षा. राष्ट्र्स्तरीय स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षामध्ये गुणानुक्रमे अग्रस्थान मिळवणार्या विद्यार्थ्यांची परंपरा
- यशस्वी आशादायी वाटचालीस अनेकांचे मदतीचे हात हातात घेऊन आश्वासक साथीने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान वाटचाल सुरु ठेवण्याचा विश्वास
स्वयंपूर्ण सुशिक्षित, सुसंस्कृत, सुजाण नागरिकत्व आणि “आपले राष्ट्र सर्वश्रॆष्ठ” हे ब्रीदवाक्य मनांत सतत ठेवून मुले आपल्या मातृभूमीची सेवा करतात.